प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तहसील कार्यालयात मनमानी कारभार, कर्मचारी तहसीलदारांना जुमानत नसल्याचे चित्र…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील तहसील कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी मनमानी करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जातीने लक्ष घालून सर्व सामान्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.दरम्यान,तहसील कार्यालयातील मनमानी कारभार करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवरही कठोर शासन करण्याचीही मागणी नागरिकांतून होत आहे.नागरिक आपल्या महसुली कामासाठी मैलोंनमैल प्रवास करुन येथे येत असतात,मात्र याठिकाणी आल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला त्यांना सामोरे जावे लागत आहे. तहसील कार्यालयात एकही काम वेळेवर होत नाही,कुणाचा कुणाला मेळ नाही,उद्धट उत्तर,कर्मचारी या ना त्या कारणाने गैरहजर या समस्यामुळे कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहेत की जनता कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून उमटत आहेत.ग्रामीण भागातील वृद्ध ग्रामस्थांना ऑफिसच्या बाहेर तासन्‌तास ताटकळत ठेवणे हा तहसील कार्यालयाचा नित्याचा उपक्रम झाला आहे.नागरिकांना उद्धट उत्तर देऊन अपमानित करणे हा तर कर्मचाऱ्यांचा नित्याचाच भाग झाला आहे.आपली कामे रखडवतील या भीतीने नागरिकसुद्धा निमुटपणे सहन करत आहेत.तर दिवस-दिवस बंद दरवाजाकडे पाहण्याची नामुष्की नागरिकांवर आली आहे.सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणी प्रमाणे तासगाव तहसील कार्यालयाचा अजब कारभार सुरू असून त्याबाबत विचारणा केल्यास कर्मचारी मुद्यापासुन पळ काढत आहे तहसिलदारांचा अंकुश या मुजोर कर्मचाऱ्यांवर अजिबात दिसून येत नाही,कर्मचारीच तहसिलदारांना जुमानत नसल्याचे दिसून येते.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.