प्रतिष्ठा न्यूज

खाडे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगोपनासाठी घेतली सोनी वनक्षेत्रातील झाडे दत्तक

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
 सांगली :  23 जूलै या दिवशी “वनसंवर्धन दिन” (Forest Conservation Day ) हा साजरा केला जातो. हा दिवस निसर्गातील प्रत्येक गोष्टी जसे झाडे, डोंगर, नद्या, वने, प्राणी, पक्षी यांचे संवर्धन व्हावे आणि समाजात नैसगिक साधनसंपत्तीविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जातो. या दिनाने औचित्य साधत मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव व वनविभाग दंडोबा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपनाचा कार्यकम वनविभागातील सोनी क्षेत्रात घेण्यात आला. अशी माहिती संस्थेच्या संचालिका सुमनताई खाडे यांनी दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये निसर्गाविषयी आत्मीयता वाढावी व त्याच्या संगोपनाची जबाबदारी आपलीच असते ही जाणीव निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. तसेच या उपक्रमासाठी वनविभागाकडून मिळालेल्या झाडांचे नुसते रोपण करून न थांबता विद्यार्थी ती झाडे सक्षम होऊपर्यंत संगोपन व निगा राखण्यासाठी दत्तक घेणार आहेत असेही सांगितले. यावेळी वनपाल तुषार भोरे व वनरक्षक सागर थोरवत यांच्या सहकाऱ्यांनी विदयार्थ्यांना डोंगराळ भागात कोणती झाडे लावावी व ती कशी लावावी? याची माहिती दिली. तसेच स्कूलच्या मुलांनी वृक्षांची तोडीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर आधारित पथनाट्याचे सादरीकरण पाटगाव सोनी येथे केले. यासाठी  या उपक्रमासाठी कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, संचालिका सुमन खाडे, प्रशांत दादा खाडे, मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील, वनविभागाच्या उपवन संरक्षक नीता कट्टे, सहा. वनसंरक्षक अजित साजणे, वनक्षेत्रपाल युवराज पाटील, मिरज तालुका भाजप उपाध्यक्ष संतोष पवार व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.