प्रतिष्ठा न्यूज

शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये विलिंग्डन महाविद्यालयातील खेळाडूंचे यश

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली :  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अंतर विभागीय मैदानी स्पर्धा सिंथेटिक ग्राउंड वरती संपन्न झाली सदर स्पर्धेमध्ये विलिंग्डन महाविद्यालयातील विद्यार्थिनी सानिका शशिकांत रुपनर बी.ए.१ हिने १०००० मीटर धावणे या क्रीडा प्रकार मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच नाना सक्तीगिरी याने ११० मीटर हार्डल्स या क्रीडा प्रकार मध्ये तृतीय क्रमांक मिळविला .  त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. व्ही.ताम्हणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुरेश कुंभार, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ.राजू कांगणे, रजिस्टर  हनुमंत उपळावीकर, डॉ. डी. बी. एडगे, डॉ. के. एस. कट्टिमनी आदी उपस्थित होते सदर विद्यार्थिनींनी सांगली विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये देखील भरीव कामगिरी केली त्यामध्ये सानिका रुपनर हिने ५००० मीटर धावणे व १०००० मीटर धावणे या क्रीडा प्रकार मध्ये प्रथम क्रमांक मिळवला,कु.चांदणी दळवी हिने २०० मीटर धावणे क्रीडा प्रकार मध्ये दुसरा क्रमांक मिळविला तर नाना सक्तीगिरी याने ११० मीटर हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक तर बांबूउडी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच महाविद्यालयाच्या रिले टिम  ४ * १०० मीटर महिला मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला , ४*४०० मीटर रिले महिला मध्ये तृतीय क्रमांक मिळविला, तर ४*४०० मीटर मिक्स रिले मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. स्नेहल सरगर ,वसुधा माळी, नंदिनी बोराडे ,चांदणी दळवी, श्रावणी जाधव,सलोनी धनवडे, करिष्मा तारळेकर सुप्रिया चव्हाण, प्रथमेश माळी इत्यादी खेळाडूंनी क्रमांक मिळविला त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय अध्यक्ष डॉ.विश्राम लोमटे, सदस्य रामकृष्ण पटवर्धन उपप्राचार्य आर.ए.कुलकर्णी, आजीव सदस्य राजकुमार पाटील.आदींचे प्रोत्साहन लाभले तर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गणेश सिंहासने, क्रीडाशिक्षक योगिता परमणे व अशोक आंबोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.