प्रतिष्ठा न्यूज

तासगावात आझाद असोसिएशनच्या वतीने युवानेते प्रभाकर पाटील यांच्या उपस्थितीत छत्री वाटप ; जाफर मुजावर यांच्या पुढाकाराणे स्तुत्य उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : येथील आझाद कला क्रीडा  व सांस्कृतीक असोसिएशनच्या वतीने पावसाळा असल्याने गरजू लोकांना  500 छत्र्यांच वाटप करण्यात आले. युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या हस्ते छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर यांच्या संकल्पनेतुन प्रभाग क्रमांक 3 मधील गरजू नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे.
बापूवाडी येथे छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रभाकर पाटील म्हणाले आझाद असोसिएशनच्या वतीने नेहमी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जाफर मुजावर यांच्या माध्यमातून संस्थेचे सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे.कोरोना काळात जाफर मुजावर यांनी नागरिकांना धान्य वाटप,प्रत्येक घरात वाफेच्या मशीन,ऑक्सिजन मशीनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना जीवदान देण्याचे कामं केले आहे.त्याचबरोबर 1000 ओबीसी एसटी एनटी च्या  विद्यार्थ्यांना दाखले वाटप करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तीन मध्ये विकास कामांचा डोंगर मुजावर यांनी उभा केला असे गौरवोद्गार यावेळी प्रभाकर पाटील यांनी काढले.
यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील व प्रभाकर पाटील यांच्या सहकार्यातूनच विविध विकास कामे करणे शक्य झाल्याचे जाफर मुजावर यांनी सांगितले,त्याचबरोबर प्रभागातील प्रलंबित कामांना गती देणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले.यावेळी विमित शिरतोडे,सागर पांढरे,प्रमोद मोहिते,विजय माळी, गोविंद शिंदे,मनोहर चव्हाण,शंकर साळुंखे,उत्तम चव्हाण,संजय लुगडे,आरिफ मुजावर,अमित शेलार, शेखर चव्हाण,उमेश माळी,रोहित शिंदे,कल्पना शिंदे,
 सुनिता कवाळे आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.