प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शहरातील पथविक्रेत्याना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांचे कर्ज वितरण

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेअंतर्गत तासगाव शहरातील पथविक्रेत्याना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते 50000/- रु. चे कर्ज वितरण करण्यात आले.कोरोना कालावधीमध्ये शहरामध्ये सर्वं पथविक्रेते,फळविक्रेते,भाजीविक्रेते ,खोकीधारक यांचे व्यवसाय बुडाले होते त्यांना व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी केंद्रशासनाने प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजना लागू करून बँकेमार्फत 1 ले कर्ज 10000/- चे तसेच त्याची परत फेड केल्यानंतर 2 रे कर्ज 20,000/- आणि त्यानंतर 3 रे कर्ज 50000/- असे वितरण करण्यात आले.
तासगाव शहरामध्ये या योजनेचा 450 पथविक्रेते यांनी लाभ घेतला आहे. तसेच या योजनेसाठी बँकांनी लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी बँक अधिकारी यांची वारंवार मिटिंग घेऊन पाठपुरावा करून कर्ज वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच ज्या पथविक्रेत्याना कर्ज मिळाले आहे अशा सर्व पथविक्रेत्याना केंद्रशासनाच्या स्वनिधी से समृद्धि या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी शहरातील सर्व पथविक्रेते यांनी त्यासाठी त्याचे ऑनलाइन फॉर्म नगरपरिषद कार्यालय मध्ये भरण्यात यावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.