प्रतिष्ठा न्यूज

तासगावात मनसेच्या दणक्याने गुटखा प्रकरणी अन्न औषध प्रशासनाचे धाडसत्र… किरकोळ व्यापाऱ्यावर कारवाई मात्र बड्या धेंड्याना अभय

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : हप्ता खोरीत बरबटलेल्या अन्न भेसळ औषध विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यातील सर्वसामान्य माणसांचे जीव धोक्यात आले असून अन्न भेसळ विभाग कारवाईच्या नावाखाली किरकोळ व्यापाऱ्यांना टार्गेट करत मोठ्या गुटखा माफियांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.सर्वसामान्यांची जान आणि मालचे जबाबदारी ही शासन आणि प्रशासन व्यवस्थेचे असते.मात्र सांगली जिल्ह्यात अन्न भेसळ विभाग स्वतःचे हप्ते खोरीपणा जपण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळत आहे, केवळ काम दाखवायचे म्हणून अन्न भेसळचे अधिकारी किरकोळ व्यापाऱ्यांवर कारवाई करत आहेत. मोठे गुटखा व्यापारी मात्र मोकाट सुटलेले आहेत.गुटका कुठून येतो, किती येतो,याची गोडाऊन कुठे आहे, तो कोणत्या गाडीने येतो याची ईत्तमभूत माहिती अन्न भेसळ विभागाला असते मात्र केवळ हप्ते खोरीमुळे याकडे दुर्लक्ष केले जाते असा आरोप मनसेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी केला आहे.
गेली दोन महिने मनसेच्या वतीने सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई करण्यासाठी तासगाव पोलीस स्टेशनं,सांगली जिल्हा पोलीस प्रमुख,अन्न व औषध प्रशासन विभाग यांना निवेदन देण्यात आले होते.परंतु यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.मंगळवारी मनसेचे पदाधिकारी अमोल काळे यांनी फूड इन्स्पेक्टर कोळी यांच्यावर कारवाई करणेबाबत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर बुधवारी अन्न औषध प्रशासनाने तासगाव येथे धाडसत्र सुरू केले.परंतु किरकोळ कारवाई वगळता बड्या धेंड्यांना अभय देण्याचे काम अन्न औषध प्रशासनाने केल्याचे दिसून येत आहे.मनसे कडून देण्यात आलेल्या निवेदनातील सांगलीचा बडा व्यापारी नरेश नानवाणी व तासगावचा बडा वितरक मोसिन अत्तार यांच्यावर प्रशासन मेहरबान का?असा सवाल मनसे नेते अमोल काळे यांनी केला आहे.बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत साजिद नबी शेख एस एस पान शॉप,आणि इरफान मुल्ला यांच्यावर कारवाई करून 3190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गू. र. नं. कलम गू. र. क्र.288/2023, भा. दं. सं. कलम 188,272,273,328 व अन्नसुरक्षा कायद्याचे कलम 59, सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम 2006चें कलम 26(2)(i) व 26(2)(iv)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु किरकोळ व्यापाऱ्यांना पकडून कारवाई करणाऱ्या प्रशासनाने मोठ्या वितरकांवर कारवाई करावी यासाठी मनसेकडून पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी सांगितले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.