प्रतिष्ठा न्यूज

सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया : आयुक्त सुनील पवार यांचे आवाहन; पाणी पुरवठ्याची दिली महिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया असे आवाहन सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी केले. आज महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आयुक्त बोलत होते.

कोटयवधी रुपये खर्च करून एखादी नवी योजना आणण्यापेक्षा कृष्णेतील पाण्यावर अद्यावत फिल्टरेशन प्लँट बसवून सांगलीला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा कसा होईल यासाठी महापालिका प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असल्याची ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

यामध्ये अनेकांनी सांगलीतील पाणी प्रश्न बाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली आहे. त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली व सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया असे भावनिक आवाहन केले.
56 MLT प्लांट अद्यावत करण्यासाठी प्रयत्न करणारा असे आयुक्तांनी सांगितले

उपायुक्त वैभव साबळे यांनी पीपीटी द्वारे सद्यस्थिती काय आहे याची माहिती दिली. बैठकीस उपायुक्त पंडित पाटील, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, पै. पृथ्वीराज पवार, रोहिणी पाटील, उर्मिला बेलवलकर, विष्णू माने, हणमंतराव पवार, पद्माकर जगदाळे, आनंदा लेंगरे, जयश्री पाटील, उत्तरं कांबळे, सुजित काटे, सर्जेराव पाटील, मयूर घोडके, माधुरी वसगडेकर, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सांगलीकर जनता उपस्थित होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.