प्रतिष्ठा न्यूज

तासगावात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन… उद्या नाभिक समाजाचा राज्यस्तरीय मोफत वधू वर मेळावा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावच्या नाभिक समाजाच्या वतीने यंदा संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.संत सेना सेवा संघाच्या वतीने परिचय कलेक्शन व ज्वेलर्सच्या सहकार्याने शनिवार दि.9 तें सोमवार दि 11 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि.९ रोजी तासगाव येथील समृद्धी हॉलमध्ये राज्यस्तरीय मोफत नाभिक वधू – वर मेळाव्याचें आयोजन करण्यात आले आहे.खासदार संजयकाका पाटील व आ.सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याची माहिती उद्योजक सुरेश माने (शेठ) यांनी दिली आहे.
यावेळी तहसीलदार रवींद्र रांजणे,नगरपरिषद मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील,गटविकास अधिकारी अविनाश मोहिते,पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ,सपोनि. बजरंग झेंडे,पोलीस प्रशिक्षण केंद्राचे सपोनि शैलेश शिंदे,वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय वाळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत स्काय वे अकॅडमीच्या संगीता काळे यांचे सेमिनार होणार आहे.तसेच शनिवारी व रविवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत सिनर्जी हॉस्पिटल सांगली यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.रविवार दि.१० रोजी १० ते २ या वेळेत क्लासिक अकॅडमी, इचलकरंजीच्या नीता संतोष गायकवाड यांचे नाभिक व्यावसायिकांसाठी सेमिनार तर याच दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत ‘दि बिझनेस बूस्टर’ मुस्तकीन साखरकर यांचे उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
सोमवार दि.११ रोजी संत सेना महाराज मंदिरात पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे.यानिमित्त श्री ची पूजा अर्चा,भजन,फुले वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे.सकाळी ९ वाजता सुप्रियाताई खंडागळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.तीन दिवस होणाऱ्या या कार्यक्रमास नाभिक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सुरेश माने व संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी केले आहे.यावेळी बाळासाहेब जाधव, प्रवीण जाधव,विजय साळुंखे, प्रभाकर गायकवाड,सुमित माने, दत्तात्रय सपकाळ, संकेत माने आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.