प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये निसर्ग मित्र यांच्या सहकार्याने वृक्षारोपण

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : निसर्ग मित्र यांच्या सहकार्याने केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. स्कूलमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करून मुलांना वृक्षारोपणाचे महत्व या कृतीतून समजावण्यात आले, या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील व विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील यांनी प्रोत्साहन दिले, या कार्यक्रमास कॅम्पस कोऑडीनेटर प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या अधिक्षिका व मुख्याध्यापिका ख्रिस्टीना मार्टिन, प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयिका अश्विनी येलकर, इस्टेट मॅनेजर विलास शेवाळे व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी निसर्ग मित्रांनी विविध झाडांबाबत उपयुक्त माहिती दिली, रोहन पाटील यांनी सर्व झाडांची निगा कशी राखावी व कशी काळजी घ्यावी याबद्दल सांगितले, यावेळी डॉ. नंदिनी पाटील आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.