प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यातील यशस्वी युवा दिग्दर्शकांच्या लघुपटांचा रविवारी सांगलीत महोत्सव

रेखासह आठ लघुपटांचे प्रदर्शन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील युवा यशस्वी तरुण दिग्दर्शकांनी निर्माण केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या ‘रेखा’सह तब्बल आठ लघुपटांचे रविवार 19 मार्च रोजी सांगली प्रदर्शन करण्यात येणार आहे. सांगली फिल्म सोसायटीने हा लक्षवेधी लघुपटांचा चित्र महोत्सव आयोजित केला असून तो सर्वांसाठी मोफत खुला असणार आहे. सोसायटीचे अध्यक्ष अशोक सावंत आणि कार्यक्रम सचिव निरंजन कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
रविवारी दुपारी दोन ते नऊ या कालावधीत हे सर्व लघुपट वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज मधील वातानुकूलित टिळक सभागृहामध्ये दाखवले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्व सिने रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शेखर रणखांबे, उमेश मालन, यशोधन गडकरी, विक्रम शिरतोडे, प्रतीक साठे, गणेश धोत्रे या यशस्वी युवा दिग्दर्शकांचे रेखा, दळण, पॉम्प्लेट, दोन चाके 435 दिवस, विठ्ठलाचे झाड, आईसक्रीम, गोल्डन टॉयलेट आणि बूट असे आठ लघुपट दाखवण्यात येणार आहेत. ऐनवेळी आणखी एक युवा दिग्दर्शकाच्या लघुपटाचे प्रीमियर ही या महोत्सवात होऊ शकते. यावेळी प्रा. नंदा पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते दिग्दर्शकांचा सत्कार आणि त्यानंतर रसिक दिग्दर्शक संवादाचा कार्यक्रम होणार आहे.
आपल्या जिल्ह्यातील या दिग्दर्शकांच्या कलाकृतींना समजून घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सिनेप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सांगली फिल्म सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.