प्रतिष्ठा न्यूज

गाडी क्रमांक 9593 आणि ‘यासिन म्हालदार’ यांची कर्तव्यनिष्ठा ‘अशी माणसे येती आणि स्मृती ठेवून जाती’

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२५ : ‘यासिन म्हालदार’ कामाबद्दल एकनिष्ठ प्रामाणिक असणार व्यक्तिमत्व.”
गगनबावडा पंचक्रोशीत सर्वत्र तुफानी पाऊस धो धो कोसळत होता. ३५० मिलिमिटर चा विक्रम करत होता. १९९० नंतर प्रथमच इतके महापुराचे भयंकर पाणी,!!… स्वतःच्या घरात पुराचे पाणी शिरलेले असतानाही त्याची फिकर न करत, त्याची तमा न बाळगता, आपले दुःख बाजूला सारून नोकरीतील निष्ठा जपत हा माणूस शेळोशी (ता. गगनबावडा ) येथील अवघडलेल्या महिलेला अनेक अडचणींशी मुकाबला करत सुखरूप मार्ग काढत कोल्हापूर ठिकाणी पोहोच करतो काय….. आणि हा अवलिया एवढ्यावर न थांबता आपल्या जीवाची पर्वा न करता पुन्हा धामणी खोरीतील आणखी दोन पेशंटना सगळीकडे पाणी असतानाच, भयंकर परिस्थिती असताना त्यांना घेऊन खडतर मार्गाने प्रवास करत, त्याही पेशंटना घेऊन सुखरुप दवाखाण्यात पोहोच करतो काय…… खरंच हा माणूस नव्हताच तर नक्कीच ‘ देव माणूस ‘ होता.
सलाम .! .समाज्याप्रती आपली असणारी भावना, त्यांच्या उतुंग विचाराला आणि त्यांच्या एकनिष्ठ सेवेला सलाम!!”
म्हणून कळत नकळत ओठावर शब्द येतात ‘अशी माणसे येती आणिक स्मृती ठेवून जाती.!’

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.