प्रतिष्ठा न्यूज

मराठा समाजाच्या हितासाठी असे वधु वर परिचय मेळावे होणे आवश्यक- भास्करराव पाटील खतगावकर

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : नायगाव येथील मराठा सेवा संघाने आयोजित केलेला मराठा वधु-वर परिचय मेळावा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून समाज हिताचा उपक्रम
असुन असे मेळावे जिल्हातील सर्व ठिकाणी झाले पाहिजेत मत माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलतांना खतगावकर म्हणाले की या महागाईच्या काळात आपल्या समाजातील सामान्य लोकांना लग्न करणे खुप कठीण झाले आहे, तेंव्हा अशा मेळाव्यातून सोयरीक जमऊन लग्न झाल्यास होणारा आर्थिक खर्च व वेळेची बचत होईल असेही खतगावकर म्हणाले.
यावेळी उदघाटन म्हणून उपस्थित असलेले माजी आ.तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष- वसंतराव पाटील चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की इतर समाजात वधू वर परिचय मेळावे होतात.पण आपला समाज संख्येने मोठा असूनही आपण मेळावे घेत नाही आता बदलत्या काळानुसार आपल्याही समाजात असे वधू वर परिचय मेळावे घेणे गरजेचे असुन या वर्षी किमान 11 सामूहिक विवाह होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे चव्हाण म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. भास्करराव पाटील खतगावकर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, नायगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा- मीनाताई पाटील कल्याण, गटशिक्षणाधिकारी एम.जे. कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वसंत सुगावे, श्रावण भिलवंडे, संभाजी भिलवंडे, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे, भाजप तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील, सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शेरा पाटील, जिल्हाध्यक्ष उद्भव सुर्यवंशी, जिल्हा संघटक डॉ. जीवन चव्हाण, पत्रकार गजानन चौधरी, माधव चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष- अशोक पाटील पवळे, उपाध्यक्ष- गंगाधर पाटील चव्हाण, सचिव- संतोष पाटील कल्याण, कार्याध्यक्ष- डि.टी.जाधव, नागेश पाटील कल्याण, जे.डी.पाटील, टि.जी.पाटील, आनंद पवार, विजय पाटील जाधव, व्ही.सी.जाधव, अशोकराव कल्याण, निळकंठराव शिंदे, आदींसह वधू वर यांचे नातेवाईक व मराठा समाजातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. मराठा समाजातील उपस्थित मान्यवरांकडून मराठा सेवा संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरेख संचलन हणमंत जाधव सर यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.