प्रतिष्ठा न्यूज

तासगावमध्ये विकसित भारत संकल्प कार्यक्रम संपन्न… शेकडो नागरिकांचा सहभाग…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव नगर परिषदेमार्फत आज विकसित भारत संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदरचा कार्यक्रम २ टप्प्यात घेणेत आला.केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी कै.डि.एम.बापू क्रीडांगण व चंपाबेन महाविद्यालय परिसरात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे खासदार मा.संजयकाका पाटील,तासगाव नगरपरिषद प्रशासक पृथ्वीराज माने-पाटील,नगरपरिषदेचे अनेक माजी पदाधिकारी हे उपस्थित होते.शहरातील शेकडो नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण रूग्णालय अधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये नगरपरिषद शाळा नंबर 9 च्या विद्यार्थिनींनी ‘धरती कहे पुकार के‘या गाण्यावरती नृत्य सादर केले.सदरच्या कार्यक्रमांमध्ये स्वच्छ भारत अभियान ,प्रधानमंत्री आवास योजना (शहरी),दीनदयाळ योजना -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ,पी एम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान कार्ड इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली.जवळपास ३०० हून अधिक नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी केली.लाईफ केअर हॅास्पिटल तासगाव यांचेमार्फत नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन याठिकाणी करण्यात आले होते.या मेळाव्यामध्ये पीएम स्वनिधी योजना अंतर्गत 30 लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र व 15 महिला बचतगटांना 50 लाखांचे कर्ज मंजूरी प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचबरोबर उज्ज्वला भारत योजने अंतर्गत 5 महिला लाभार्थीना गॅस शेगडी चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 50 नागरिकांची आधार नोंदणी व 60 लाभार्थींचे आधारकार्ड अद्ययावत करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.