प्रतिष्ठा न्यूज

पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्‍यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी सुट्टी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 26 : सांगली जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने व जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणची पाणी पातळी 38.07 फुट झाल्याने कृष्णा नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्‍कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय वि‌द्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी त्यांना प्राप्‍त अधिकारान्‍वये सांगली जिल्ह्यातील मिरज (सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्‍यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महावि‌द्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्‍त व्‍यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्‍या आस्‍थापनेवरील शैक्षणिक संस्‍थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तथापी या कालावधीत सर्व मुख्‍याध्‍यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात / महाविद्यालयात उपस्थित राहून स्‍थानिक प्रशासनाच्‍या आदेशानुसार आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचे कामकाज करण्याचे आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.