प्रतिष्ठा न्यूज

एन.एस.सोटी विधी महाविद्यालयात डॉ.ज्ञानचंद्र पाटील यांचे संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२७ : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने येथील एन.एस.सोटी विधी महाविद्यालयाचे ‘कॉन्स्टीट्यूशनल क्‍लब’ तर्फे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. अमित सवदी यांनी प्रास्ताविक केले. भारतीय राज्यघटनेतील मुल्ये, मुलभूत अधिकार, माहितीचे स्वंतंत्र बाबत प्रमुख मार्गदर्शन डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी केले. यावेळी संविधान उद्देशिकाचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले. प्राध्यापक एम. एम. देशपांडे, ए.डी.कुरणे, पी.एस.जोशी, ए.व्ही.कुलकर्णी, बी.के.जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

ऋतुजा शिरोटे, प्रज्ञा सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले, तर  स्नेहल झळके, अभिषेक गडदे, रोहन पाटील, गौरी मराठे, अवधूत सुतार, सिद्धांत शहा, स्नेहल माळी, तेजस सन्मुख, इजाज तांबोळी, आकाश सावंत, अस्मिता शहा, अमोल वेटम आदी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त करत संविधानाचे महत्व अधोरेखित केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.