प्रतिष्ठा न्यूज

शालेय मुली, महिला सुरक्षेसाठी प्राधान्य देणार- पोलीस उपनिरीक्षक पवार

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.28 : शालेय शिक्षण घेणा-या मुलींना दामिनी पथकाच्या माध्यमातून संरक्षण दिले जाते.तसेच महिलांचे कौटुंबिक समस्या सोडविल्या जातात. शहरात शिक्षण घेणा-या मुलींसाठी सुरक्षा देणे, महिला पोलीस गस्त वाढविणे यांसाठी सातत्याने प्रयत्न करू असे प्रतिपादन शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आरती पवार यांनी केले.त्या राजर्षी शाहू विद्यालयात” शोध नवदुर्गा” चा या उपक्रमात सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या. शाळेतील सहशिक्षीका श्रीमती एन.एस.खुळे , प्राचार्य श्री बालाजी हंगरगे यांच्या हस्ते पुष्पहार,सन्मानपत्र देऊन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आरती शिरीष पवार यांचा शाळा आणि शिक्षण विभाग (मा.) यांच्या कडून गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मुलींनी निर्भयपणे समाजात वावरले पाहिजे. कोणत्याही शाळेबाहेरील हुल्लडबाजी करणा-या,पोरांकडून त्रास होत असेल तर आपल्याशी संपर्क साधा. आपण अशा टोळक्यांची गय करणार नाही असे त्यांनी सांगितले. आज समाजात समुपदेशन करण्याची नितांत गरज आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आरती पवार यांचे हस्ते विद्यार्थ्यांनी (नवदुर्गा) इयत्ता नववी (अ) कु. सृष्टी तावडे, कस्तूरबा विद्यालय विद्यार्थ्यांनी कु. जान्हवी राक्षसमारे यांचा प्रमाणपत्र, देऊन,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री बी.एम.हंगरगे हे होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत, आनंद मोरे, श्री एन.पी.केंद्रे, अशोकराव गळेगावे, राजेश कदम रत्नाकर कोत्तापल्लेकोत्तापल्ले, गोपाळ मोरे, डॉ.माणिक गाडेकर, वैजनाथ आर्दड, श्रीमती कांता जायेभाये, श्रीमती सुनीता पावसे, श्रीमती मथुरा घोडेकर, श्रीमती लक्ष्मीबाई वानोळे आदीजण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवानंद टापरे यांनी केले तर आभार क्रिडा विभाग प्रमुख श्री टी.एन.रामनबैनवाड यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.