प्रतिष्ठा न्यूज

ज्ञानदीप हायस्कूल सावरगाव येथे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : निसर्गात ओझोन वायूचे प्रमाण वाढून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज लक्षात घेता आज दि.20 जुलै 2023 रोजी ज्ञानदीप हायस्कूल सावरगाव ता.हदगाव जि.नांदेड येथे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवडा, वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला.

शिक्षक सेना राज्य अध्यक्ष श्री ज.मो.अभ्यंकर, राज्य उपाध्यक्ष श्री विठूभाऊ चव्हाण, जिल्हा अध्यक्ष श्री संतोष अंबुलगेकर,श्री तानाजी पवार सर,रवींद्र बंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी वृक्षारोपण करण्यात येऊन माजी मुख्यमंत्री ना.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बेडके व्ही. बी. क्रिडाशिक्षक ठाकूर एच.बी.समुपदेशक तथा विज्ञान शिक्षक कारखेडे बी.एम.गणित शिक्षक हात्ते एम. एस.सेवक जी.व्ही.मुळेकर व आर.जे.डाके आणि शाळेतील विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.