प्रतिष्ठा न्यूज

शशीकलाबाई पाटील सिरसाट यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्युज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील जेष्ठ महिला शशीकलाबाई दिगांबर पाटील सिरसाट यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज दि.19 जुलै 2023 रोज बुधवारी दुपारी 3: 15 वाजता दुःखद निधन झाले होते, त्यांच्यावर दि. 20 जुलै 2023 रोजी दुपारी 1:00 वाजता उमरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी कापशी (गुंफा) मठाचे- रूद्रगिर महाराज, शिवसेनेचे माजी आ.- रोहिदास चव्हाण, मुक्तेश्वरभाऊ धोंडगे, बालाजी पाटील मारतळेकर, बाबुराव पाटील कापसीकर, दासराव पाटील हंबर्डे, ॲड.पुरुषोत्तमराव धोंडगे, स्वप्नील पाटील उमरेकर, डॉ. सचिन पाटील उमरेकर, गणेश कुंटेवार, सुरेश पाटील हिलाल, परमेश्वर जाधव, विठ्ठलराव पाटील भुत्ते, रामराव पाटील मोरे, विजय जाधव मोकासदरा, सुभाष गायकवाड, प्रा. संभाजी वर्ताळे, संजय पाटील ढाले, एपीआय- मारोती परगेवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल- मंगनाळे, हंबर्डे, सय्यद, जाधव, कंधारे, कुंभरवाड, यनगंटी, दादाराव पवार, विनायक भरकडे, विश्वम्बर हंबर्डे, सरपंच- साईनाथ पवार, कैलास धोंडे, शिवाजी पाटील तुप्पेकर, संदीप घोरबांड, प्रल्हाद घोरबांड, प्रभाकर ढाले, संभाजी मोरे आलेगावकर, संदीप पाटील, गणेश पाटील वाकोरे, रमेश भुरे, धार्मिक, सामाजिक, राजकीय, व प्रशासन सेवेतील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. शशिकलाबाई पाटील सिरसाट या नांदेड भाग्यनगर पोलीचे ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल- शिवाजी पाटील सिरसाट, लोहा तालुका शिवसेनेचे संघटक- नागोराव पाटील सिरसाट, भुजंगराव पाटील सिरसाट, यांच्या आई होत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.