प्रतिष्ठा न्यूज

बेदाणा उधळनीची प्रत्यक्ष जाऊन चौकशी करा – जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा उधळण करून अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू आहे,अशी तक्रार मनसे नेते अमोल काळे यांनी दिली असून यासंबंधी बेदाणा उधळनीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या तक्रारीची चौकशी करा व त्याचा चौकशी अहवाल १५ दिवसात दया असे आदेश जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सहाय्यक निबंधक तासगाव यांना दिले आहेत.
दिलेल्या निवेदनात अमोल काळे यांनी सांगितले की बेदाणा उधळणीतून शेतकऱ्यांची अडत्यांनकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लुट केली जात आहे.वर्षाला सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण होते.यातून अडत्यांचा कोट्यावधी रुपये कमवण्याचा कारभार चालू आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला बेदाणा सौद्यामध्ये उधळून तो पायाखाली तुडवला जातो.
१५ किलोच्या बेदानाच्या बॉक्समधून सरासरी ३ किलो बेदाण्याची उधळण केली जाते.सौद्यात हवा तो दर नाही मिळाला तर पुन्हा पुढच्या सौद्यावेळी अशीच मालाची उधळण केली जाते. संपूर्ण हंगामात सुमारे तीन ते चार हजार कलमांचा सौदा होतो,जितकी कलमे तितके बॉक्स फोडून मालाची उधळण होते.सौद्यानंतर खाली पडलेला बेदाणा अडतेच गोळा करातात.हंगामात एका सौद्यात सुमारे १०० टनापर्यंत उधळण केलेला बेदाणा खाली पडलेला असतो,असे वर्षभरात १२० ते १३० सौदे होतात वर्षाला तब्बल एक हजार टन बेदाण्याची उधळण होते.उधळण झालेला बेदाणा अडते स्वतः ताब्यात घेऊन,पॉलिश करून तो पुन्हा विकतात हा बेदाणा किमान १०० रु. प्रतिकिलो जरी विकला गेला,तरी सुमारे दहा कोटी पर्यंत फायदा अडत व्यापाऱ्यांचा होतो. दीपावळीमध्ये हा माल विकायला काढला जातो.यातूनच कामगारांना बोनस,उचला दिल्या जातात खुलेआम बेदाणा उत्पादकांची लुट होत असताना,बाजार समितीचे पदाधिकारी आणि प्रशासन सोयीस्कर कानाडोळा करत आहे.अशा प्रकारे बेसुमारपणे बेदाणा उत्पादकांची लुट होत आहे,याला आळा बसने गरजेचे आहे.शेतकऱ्यांची व्यापारी व खरेदीदार यांच्या साखळीने पिळवणूक होत असून सावकारकी जोरात सुरू आहे याची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी माणसे नेते अमोल काळे यांनी केली होती यावर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सहाय्यक निबंधक तासगाव यांना पत्र व्यवहार करत बेदाणा उधळनीची प्रत्यक्ष पाहणी करून काळे यांच्या तक्रारीचा अहवाल पंधरा दिवसात द्या असे आदेश दिले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.