प्रतिष्ठा न्यूज

राणी चिन्नम्मा एक्स्प्रेस आणि परळी वैज्यनाथ डेमू रेल्वे आता सांगली स्टेशनपर्यंत : खासदार संजयकाका पाटील यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : बेंगलोर ते मिरज असणारी राणी चिन्नम्मा एक्स्प्रेस ही रेल्वे क्र. १६५८९-९० आणि परळी वैज्यनाथ ते मिरज असणारी डेमू रेल्वे क्र. ११४११-१२ ही रेल्वे आता सांगली रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारीत करण्यात आलेली असलेबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी माहिती दिली. याबाबतची आज रेल्वे बोर्डचे संयुक्त निदेशक विवेक कुमार सिन्हा यांच्या सहीने ऑर्डर प्रसिद्ध झाली.
खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले, गेल्या काही दिवसापासून राणी चिन्नम्मा एक्स्प्रेस आणि परळी वैज्यनाथ डेमू रेल्वे मिरज पासून पुढे सांगली पर्यंत विस्तारीत करुन कार्यांवित करणेबाबत रेल्वे मंत्री मा.अश्विनी वैश्नव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे पाठपुरावा सुरु होता. त्याकरीता सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटनेकडूनही मागणी करण्यात आली होती. या दोन्हीही रेल्वेंमुळे सांगली शहरातील प्रवाशांची सोय होणार आहे.
नुकतेच सांगली रेल्वे स्टेशनचा केंद्र शासनाच्या ‘अमृत स्टेशन योजना’ या महत्वाकांक्षी योजनेत समावेश करण्यात आला असून हे स्टेशन अद्ययावत करण्यासाठी पंतप्रधान याच्या शुभहस्ते भुमिपूजन कार्यक्रमही पार पडला आहे. याच पार्श्वभुमीवर रेल्वेगाड्यांचा विस्तार व नवीन रेल्वेगाड्या सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचीच सुरुवात म्हणून राणी चिन्नम्मा एक्स्प्रेस आणि परळी वैज्यनाथ डेमू रेल्वे मिरज पासून पुढे सांगली पर्यंत विस्तारीत करुन करण्यात आली असल्याचे मत खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.