प्रतिष्ठा न्यूज

सोशल मीडियावर इयत्ता 10 वी आणि 12 वी परिक्षेबद्ल अफवा पसरविल्यास कारवाई: सायबर सेल पोलिसांचे विशेष लक्ष

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : दहावी व बारावी परीक्षा संदर्भात समाज माध्यमांद्वारे सोशल मीडियावर जर कोणी चुकीच्या बातम्या पसरवत असेल तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशा अफवांवर जिल्ह्याची सायबर सेल लक्ष ठेवून आहे. अफवा पसरविणाऱ्यांची थेट तुरुंगात रवानगी केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणार असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२) वीची लेखी परीक्षा दि.२१ फेब्रुवारी ते दि.१९ मार्च २०२४ व माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा दि.२० मार्च ते दि.२३ मार्च या कालावधीत तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची लेखी परीक्षा दि.१ मार्च ते दि. २६ मार्च या कालावधीत होणार आहे.
इयत्ता १२ वी व १० वीच्या परीक्षा कालावधीत विविध माध्यमाद्वारे तसेच सोशल मिडीयावर परीक्षेच्या अनुषंगाने अफवा प्रसारित केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था वाढते. म्हणून अशा अफवा तसेच विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केल्या जाणाऱ्या बातम्या पसरविणाऱ्यांच्या विरोधात मंडळामार्फत कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा पुणे शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.