प्रतिष्ठा न्यूज

तासगावात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत राजकीय व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप… बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीस अडथळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरात काही टवाळखोर व रोडरोमिओंकडून वाहतुकीसंबंधीच्या नियमांची पायमल्ली करून एकाच दुचाकीवर तीन ते चार जण बसून प्रवास करताना दिसून येतात.अशा व्यक्तींवर निर्बंध लादणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे वाहतूक पोलिसांसमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.
काही टवाळखोरांकडून मोठमोठ्याने हॉर्न वाजवत व रेस वाढवत वेगाने गाडी चालवली जात आहे.तर काही बुलेटस्वारांकडून सायलेंसरचा आवाज करत तसेच फटाके फोडत गाडी चालवली जाते.त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना तसेच रस्त्यातील इतर वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच चारचाकी वाहन धारक आपली वाहने ठरवून दिलेल्या पार्किंग मध्ये न लावता मेन रोडवर उभी करून इतरत्र फिरताना दिसून येत असून आहेत.त्यांच्या बेशिस्त पार्किंग मुळे शहरात कायमच ट्राफिक जाम होत असल्याचे दिसत आहे.बऱ्याच वेळा बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास पकडले असता त्यांच्या कडे गाडीची कागदपत्रे, लायसन मागितल्यास ते लगेच आपल्या परिसरातील दादा,भाऊ अथवा राजकीय वजन असलेल्या व्यक्तीला फोन करून वाहतूक पोलिसांना देतात,त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील नको आपल्या डोक्याला ताप असे म्हणत त्याला काही वेळात सोडून देतात.त्यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींचा अधिकच आत्मविशास वाढत असल्याने पुन्हा ते नियम पाळण्याच्या भानगडीत पडत नाहीत.अशा राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळेच शहरातील बेशिस्त वाहनचालकांना खतपाणी मिळत आहे.त्यामुळे वाहतूक पोलिसांनी राजकीय व्यक्तींचा मुलाहिजा न राखता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.