प्रतिष्ठा न्यूज

महिलेस अडवुन जबरी चोरी करणारे जेरबंद; एलसीबीची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महिलेस अडवुन जबरी चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. चोरट्यांकडून १,१५,२५०/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी १) अक्षय श्रीकांत पाटोळे, वय २४ वर्षे, रा. गुरलेश्वर आप्पा मंदिराजवळ, डफळापुर, ता. जत, जि. सांगली. २) अमोल बाबासाहेब रुपनर, वय २२ वर्षे, रा. रुपनरवाडी, नागज, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.. ३) किसन लक्ष्मण नरळे, वय २२ रा. नरळे वस्ती, घोडपडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

या कारवाईत मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोहेकॉ/ दिपक गायकवाड, अमोल ऐदाळे, आमसिध्द खोत, अरुण पाटील, अमर नरळे, पोना/ प्रकाश पाटील, पोशि / विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, सुरज थोरात, सुनिल जाधव, पोशिचा / सुशांत चिले, पोशि / कॅप्टन गुंडवाडे, यांनी सहभाग घेतला.
याबाबत माहिती अशी, मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन जबरी चोरी करणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि.२५/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांचे पथकातील पोहेकॉ / दिपक गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, १) अक्षय श्रीकांत पाटोळे, रा. डफळापुर २ ) अमोल बाबासाहेब रुपनर, रा. नागज आणि ३) किसन लक्ष्मण नरळे रा. घोरपडी यांनी जबरी चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करीता मिरज स्टॅण्ड येथे येणारआहेत. नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मिरज एस. टी स्टॅण्ड परिसरात जावून निगराणी करत असताना, एस टी स्टॅण्डचे पाठीमागे तिन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) अक्षय श्रीकांत पाटोळे, वय २४ वर्षे, रा. गुरलेश्वर आप्पा मंदिराजवळ, डफळापुर, ता. जत, जि. सांगली. २) अमोल बाबासाहेब रुपनर, वय २२ वर्षे, रा. रुपनरवाडी नागज, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली. ३) किसन लक्ष्मण नरळे, वय २२ रा. नरळे वस्ती, घोडपडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली अशी असल्याची सांगितली. सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचेकडे सोन्याचे दागिने मिळून आले. सदर मिळाले दागिन्याचे मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता अक्षय पाटोळे याने सांगितले की, ते तिघे व त्यांचा मित्र तुषार गायकवाड, रा. नागज अशांनी मिळून ऑक्टोबर महिन्यात कोगनोळी ते अग्रणी धुळगाव जाणारे रोडवर स्कुटीवरून जाणाऱ्या एका महिलेस मोटार सायकली आडव्या घालून थांबवून तिला चाकूचा धाक दाखवुन तिचेकडील सोन्याचे दागिने चोरी केली असल्याची कबूली दिली.

सदर मिळाले मुद्देमालाबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता, सदर वर्णनाच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी केलेबाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्ज्ञातील मुद्देमाल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन, पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.