प्रतिष्ठा न्यूज

पिनॉमिक वेंचर्स ॲण्ड डेवलपर्सचे संचालक विपुल पाटील, पंकज पाटील, संतोष घोडके, अभिजीत जाधव आज सांगली पोलिसांना शरण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गेल्या जुलै महिन्या पासून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे संपुर्ण महाराष्ट्रात शेअर मार्केटींग इनवेस्टमेंटच्या नावाखाली थाटलेल्या बोगस कंपनीज विरूद्ध आंदोलन सुरू केले आहे.
या अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांना भेटून या बाबत माहिती देऊन हा घोटाळा निदर्शनास आणून दिला.
तसेच यासंदर्भात जनजागृती मेळावे आयोजित केले व सांगली जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा सांगली येथे अनेक गुंतवणूकदारांना घेऊन तक्रारी दाखल केल्या.
तसेच यासंदर्भात ईडी ला माहिती देऊन तक्रार दाखल केली.
या अंतर्गत या बोगस कंपनीज विरूद्ध FIR रजिस्टर झाल्या. यातील काही कंपनीजच्या संचालकांना अटक सुद्धा झाली आहे.
यापैकीच एक पिनॉमिक वेंचर्स अॅन्ड डेवलपर्स हि कंपनी आहे. २ महिन्यापुर्वी पिनॉमिक वेंचर्स अॅन्ड डेवलपर्स या बोगस कंपनीविरोधात सांगली जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा, सांगली येथे MPID/420 या अंतर्गत १० कोटी पर्यंतची FIR दाखल झाली आहे. २ महिन्यापासून या कंपनीचे संचालक फरार होते. विपुल पाटील, पंकज पाटील, संतोष घोडके, अभिजित जाधव अशी संचालकांची नावे आहेत.
त्यांनी सांगली न्यायालय तसेच मुंबई हायकोर्टमधे अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून दिनांक ३० जानेवारी पासून ३ दिवस सांगली जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा सांगली येथे हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज ते चौघेही सांगली जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा येथे शरण आले आहेत.
त्याच बाबात आज आम्ही सांगलीचे पोलीस अधिक्षक मा. बसवराज तेली साहेब यांची भेट घेतली.
या कंपनी विरोधात कर्नाटक मधे ७५ कोटी, कोल्हापूर मधे २० कोटी तसेच सांगलीमधे १० कोटी रुपयांच्या तक्रारी नोंद आहेत.
या घोटाळ्याची व्याप्ती पाहता शेकडो कोटींचा हा घोटाळा आहे.
तरी, या कंपनीजच्या गुंतवणूकदारांना आम्ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून सर्व गुंतवणूकदारांना आवाहन करतो कि आपण आपले कष्टाने मिळवून गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी तक्रार देण्यासाठी पुढे या. आम्ही तुमच्यसोबत ठामपणे उभे राहू व कायदेशीर मार्गाने आपले पैसे आपसणास परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.