प्रतिष्ठा न्यूज

वासुंबे ब्रम्हनाथ विकास सोसायटी चेअरमनपदी राष्ट्रवादीच्या अमर पांढरे यांची बिनविरोध निवड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : वासुंबे येथील श्री ब्रह्मनाथ सर्व सेवा विकास सहकारी सोसायटी मर्या.वासुंबे या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सोसायटीच्या चेअरमन पदी आज राष्ट्रवादीच्या अमर शिवाजी पांढरे यांची बिनविरोध झाली.अडीच वर्षांपूर्वी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली होती.बिनविरोध निवडीच्या वेळी स्व.आर.आर.आबा पाटील गटास बाळासाहेब एडके नाना यांच्या नेतृत्वाखाली सात जागा मिळाल्या होत्या,व खासदार संजय काका गटास सहा जागा मिळाल्या होत्या.गावातील दोन्ही गटाच्या नेत्यांच्या संचालक निवडीच्या वेळी झालेल्या चर्चेनुसार अडीच वर्षांपूर्वी सोसायटीच्या सत्ता स्थापनाच्या वेळी खासदार संजय काका गटास अडीच वर्षासाठी चेअरमन पद,व स्व.आर. आर.आबा गटास व्हाईस चेअरमन पद अडीच वर्षासाठी अशी चर्चा व कार्यकाल ठरला होता.खासदार संजय काका गटाचा चेअरमन पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल  संपल्यानंतर आज आबा गटाचे नूतन चेअरमनपदी अमर पांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत,फटाके फोडून जल्लोष केला.यावेळी गावातील प्रमुख मंडळींनी, कार्यकर्त्यांनी अमर पांढरे यांना शुभेच्छा दिल्या.या निवडीवेळी ब्रम्हनाथ विकास सोसायटीचे  संचालक,आजी-माजी चेअरमन,व्हाईस चेअरमन,गावातील सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य,यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.