प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथील अग्रणी नदी पात्रात जलपर्णीचा विळखा खराब व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात : या प्रतिष्ठा न्यूजच्या बातमीच्या दणक्याने स्थानिक प्रशासनाला जाग; नागरिकांना तात्पुरता दिलासा

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज ता. ४ : पावसाचा जोर ओसरल्यामुळे अग्रणी नदीपात्रातील वाहते पाणी कमी होऊन नदीपात्रास गटारीचे स्वरूप आले होते त्यातच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नदीपात्रात जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे नदीतील वाहते पाणी बंद झाल्याने दुर्गंधीयुक्त जलपर्णीमुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित झाले होते त्यामुळे येथील नागरिक व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता याबाबत नागरिकांच्यातून प्रदूषण नियंत्रण विभागाने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत होती तरीही याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती सुदैवाने यावर्षी चांगला पाऊस होऊन अग्रणी नदीवरील सिद्धेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तलावात सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे त्यात प्रतिष्ठा न्युज बातमीच्या दणक्याने स्थानिक प्रशासनाने योग्य दखल घेऊन अग्रणी नदीस पाणी सोडल्यामुळे दूषित पाणी निघून जाऊन अग्रणी नदी पुन्हा एकदा वाहती झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात का होईना येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे थोड्या दिवसांसाठी तरी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.