प्रतिष्ठा न्यूज

प्रा.डॉ.व्यंकटेश जंबगी यांना संत नामदेव बालनाट्य पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.व्यंकटेश जंबगी यांच्या “बालमंच”या बालनाट्य संग्रहाला राष्ट्रीय संत नामदेव महाराज पुरस्कार मिळाला आहे.समृद्धी प्रकाशन संस्था, हिंगोली यांनी
राष्ट्रीय पातळीवर हिंदी आणि मराठी भाषेतील साहित्य पुरस्कार जाहीर केले आहेत.”बालमंच”या बालनाट्य संग्रहाला यापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचा तसेच
बालसाहित्य परिषद, कोल्हापूर यांचाही पुरस्कार मिळाला आहे.प्रा. डॉ.जंबगी यांची आतापर्यंत दहा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी काही पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्तीचे काम चालू आहे.त्यात “बालमंच”, “श्रीमद्भागवत् महापुराण कथा आणि तत्वबोध”,”BCG पासून ECG पर्यंत”, “विषय विविधा”
(दुसरी आवृत्ती पूर्ण) अशी पुस्तके आहेत.ते स्वतः श्री मद्भागवत् महापुराण सप्ताह प्रवचन करतात.अनेक विषयावर व्याख्याने देत असतात.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.