प्रतिष्ठा न्यूज

सिकई मार्शल आर्ट व किक बॉक्सिंग स्पर्धेत अस्मिता संकपाळचे यश

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.३ : जिल्हास्तरावर झालेल्या सिकई मार्शल आर्ट व किक बॉक्सिंग या दोन्ही स्पर्धेत परशुराम विद्यामंदिरची विद्यार्थिनी अस्मिता संकपाळ हिने प्रथम क्रमांक मिळविला. तिची अंतर विभागीय स्तरावर निवड झाली आहे. या स्पर्धा तारदाळ व नरंदे ( ता. हातकणंगले) येथे पार पडल्या.
या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक रंगराव गोसावी, क्रीडा शिक्षक थोरात,फरीदा बोबडे, रजीउल्ला जमादार व वडील रामचंद्र संकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
तिचे कौशल्य पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिला शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेत थेट प्रवेश देणार असल्याचे सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.