प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राचा पहिला वर्धापनदिन साजरा : वर्षभरात झाल्या 53 हजार तपासण्या तर नागरिकांचे सव्वा कोटी वाचले

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राचा पहिला वर्धापनदिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रामध्ये मागील वर्षभरात या निदान केंद्रामध्ये 53 हजार तपासण्या नागरिकांनी करुन घेतल्या. यामुळे वर्षभरात नागरिकांचे सव्वा कोटी वाचले आहेत . सोमवारी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, गटनेते भारती दिगडे, उपायुक्ता राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती निदान केंद्राचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपलिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना एकाच ठिकाणी 63 प्रकारच्या तपासण्या या अगदी अत्यल्प दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून मध्यवर्ती निदान केंद्राची सुरवात झाली. या मध्यवर्ती निदान केंद्रात महालॅबच्या माध्यमातून अत्यल्प दरात 63 प्रकारच्या वेगवेगळ्या रक्त चाचण्या केल्या जात आहेत. याचबरोबर एक्सरेची सुद्धा सोय आहे. या मध्यवर्ती निदान केंद्रामुळे नागरिकांनी सवलतीत रक्त तपासण्या उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या सेवेचा नागरिकांनी लाभ घेत मागील वर्षभरात 53 हजारच्यावर तपासण्या करून घेतल्या आहेत. तर महापालिकेकडे वर्षभरात 11 लाखाच्या आसपास उत्पन्न जमा झाले आहे. या वर्षभरातील नागरिकांनी केलेल्या तपासणी पाहिल्या तर नागरिकांची सव्वा कोटींची बचत यामुळे झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे मध्यवर्ती निदान केंद्र सर्वसामान्य नागरिकांसाठी एक पर्वणी ठरले आहे. या निदान केंद्राचा पाहिला वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. महापौर दिग्विजय सुर्यवंशी, गटनेते भारती दिगडे, उपायुक्ता राहुल रोकडे , उपायुक्त चंद्रकांत आडके, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, मनपा वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील, विभागप्रमुख काका हलवाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती निदान केंद्राचा केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मध्यवर्ती निदान केंद्राचा सर्व वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता. दरम्यान महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राचा नागरिकांनी यापुढेही लाभ घ्यावा असे आवाहन महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.