प्रतिष्ठा न्यूज

वनरक्षकाचा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात मृत्यू

प्रतिष्ठा न्यूज /प्रतिनिधी
 चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील वनपरीक्षेत्र खडसंगी (बफर झोन ) अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्र बोथली (वहानगाव) येथे कार्यरत असणारे वनरक्षक सुरेश केंद्रे (३४) यांचा रविवारी रात्रो ११.३० सुमारास कर्तव्यावरून स्वतःच्या दुचाकीने परत येत असताना चिमूर – वरोरा राष्ट्रिय महामार्गावरील वहानगाव जवळ झालेल्या अपघातात जागेवरच मृत्यू झाला.
         वनरक्षक सुरेश केंद्रे हे वनक्षेत्र बोथली (वहानगाव) बिटात रात्रो गस्त करण्यासाठी गेले होते.दरम्यान कर्तव्यारून घरी खडसंगीकडे परत येत असतांना वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गावरील वहानगाव जवळ झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या मार्गानी प्रवास करणाऱ्या वाटसरूना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनेची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांना दिली.धानकुटे तातळीने वन कर्मचाऱ्यांसह  घटनास्थळी पोहचले.त्यांनी अपघाताची माहिती शेगाव पोलीस स्टेशनला दिली.शेगाव पोलीसांनी घटनास्थळावर पोहचुन घटनेचा पंचनामा केला.शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविले.शवाची उत्तरीय तपासणी करून त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे.अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेने झाला की वन्य प्राण्याच्या हे अजुन स्पस्ट झाले नसुन पुढील तपास शेगाव (बु.)पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सरोदे करीत  आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.