प्रतिष्ठा न्यूज

आजपासून तासगाव शहर आणि वासुंबे हद्दीत एक दिवस आड पाणी पुरवठा होणार…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:यंदा पाऊस कमी झाल्याने कृष्णा नदीत पाणी कमी असल्याने ऑक्टोबर मधेच पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे.त्यामुळे तासगाव नगरपरिषद व वासुंबे हद्दीतील सर्व नळ कनेक्शन धारकांना पालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे की कृष्णा नदी पात्रात पाण्याची पातळी पूर्णपणे खालावलेली असलेने आज गुरुवार दि. 26/10/2023 पासून तासगांव शहरास व वासुंबे हद्दीत एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.तासगाव शहराला कृष्णा नदीतून भुवनेश्वर वाडी येथील जॅकवेल मधून पाणीपुरवठा होतो,परंतुगेल्या चार दिवसापासून नदीची पाण्याची पातळी झपाट्याने खालवली आहे.तसेच सध्या जॅकवेल असलेलं पात्र पूर्ण कोरडे पडले आहे.सध्य स्तिथीला एक दिवसच पाणीपुरवठा होईल एवढीच पाणीपातळी शिल्लक आहे.कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी दोन् दिवसांनी भिलवडीला पोचते. कृष्णा नदी पात्रातील पाण्याने तळ गाठला असल्याने गाळमिश्रित पाणी उपसा होण्याची शक्यता असलेने सर्व नळकनेक्शन धारकांनी पाणी शास्त्रोक्त पद्धतीने गाळून व उकळून प्यावे.त्यामुळे शहरवासीयांनी पाणीटंचाईच्या या काळात पाण्याचा अपव्यय न करून नगरपरिषदेस सहकार्य करावे अशी विनंती मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.