प्रतिष्ठा न्यूज

डी. वाय. पाटील’ साखर कारखान्‍यास ‘सर्वोत्‍कृष्‍ट पर्यावरण संवर्धन’ पुरस्‍कार प्रदान

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे  गळीत हंगाम 2022-23 साठी देण्यात येणारा राज्यस्तरीय “कै.किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन” पुरस्काराने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात आले.

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते व व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील साहेब यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन बंडोपंत कोटकर, कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांच्यासह सर्व संचालक, पर्यावरण पूरक अधिकारी अमर भांबूरे व खातेप्रमुख  उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.