प्रतिष्ठा न्यूज

वासुंबे येथील गगनभरारी युथ फॉउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर वासुंबे गावातील शेकडो युवकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या गगनभरारी युथ फाउंडेशनचा उपक्रम सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरतो आहे.गावातील युवकांनी नवीन वर्षानिमित्त मळलेल्या वाटा सोडून गावातील प्राथमिक शाळेस हजारो रुपयांची स्मार्ट टीव्ही भेट स्वरूपात दिली.संपूर्ण जग डिजिटल होतेय,त्यात शाळा देखील पाठीमागे नाहीत.बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शाळांनी पुढचे पाऊल टाकले आहे.कैक सामाजिक उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन गावची अस्मिता विविध अंगांनी जागृत करण्याचा उदात्त हेतू उराशी बाळगत युवकांनी हे फाऊंडेशन सुरू केलेय.एखादे संघटन किती मजबूत असू शकते हे गगनभरारी च्या रूपाने पाहायला मिळतेय.स्मार्ट टीव्ही अनावरण शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, कांबळे मॅडम,माळवदे सर यांच्या उपस्थित संपन्न झाला.
याप्रसंगी गगनभरारी फाऊंडेशनचे सुशांत पाटील,विजय पाटील,निलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक रमेश पाटील,सुनील पाटील,श्री पाटील, अमर पांढरे,गणेश पाटील,विश्वजीत थिटे,अमित वाघमोडे,अमोल एडके,गणेश एडके,कुंडलिक एडके,वाहिद मुल्ला,संदीप पाटील,मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.