प्रतिष्ठा न्यूज

गटशिक्षणाधिकारी श्री सोनटक्के यांचा राजर्षी शाहू विद्यालयात सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/जिल्हा प्रतिनिधी
नांदेड दि. 19 : लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रविंद्र सोनटक्के यांचा शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांचा राजर्षी शाहू विद्यालयात सत्कार करण्यात आला. श्री सोनटक्के यांचा कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून नावलौकीक आहे.
गटशिक्षण अधिकारी श्री रवींद्र सोनटक्के यांचा शहरातील वसंत नगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय येथे गौरव करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के यांची नुकतीच भंडारा जिल्हा परिषद मध्ये शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे .त्यांच्या या निवडीबद्दल राजर्षी शाहू विद्यालय नांदेड येथे त्यांचा शाळेचे प्राचार्य श्री बी. एम .हंगरगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील वरिष्ठ क्लार्क श्री वैजनाथ अर्दड, श्री आर.आर. महालिंगे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री मेकाले, शिक्षक श्री राजेश कदम, श्री आनंद मोरे, श्री रत्नाकर कोत्तापल्ले, डॉ. माणिक गाडेकर, श्री संतोष बिरादार , श्री राजू पवार, श्री मोरे , श्री वाघमारे ,श्रीमती घोडेकर ,श्रीमती जाधव तसेच सर्व शिक्षक वृंद याप्रसंगी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.