प्रतिष्ठा न्यूज

शिवराजमुद्रा अर्बनच्या सामाजिक उपक्रमातून महाटी गावात डस्टबीनचे वाटप-गाव स्वच्छतेला हातभार

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड प्रतिनिधी : मुदखेड तालुक्यातील महाटी येथे शिवराजमुद्रा अर्बन बँक, मारतळा यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हनुमान मंदीर परीसर स्वच्छ राहण्याकरिता डस्टबिनचे वाटप कऱण्यात आले.
एक सामाजिक उपक्रम म्हणुन शिवराजमुद्राने
आतापर्यंत माळकौठ्ठा व चिलपीपरी येथे गाव, शाळा, मंदीर, सार्वजनिक ठिकाण स्वच्छ राहण्यासाठी डस्टबीन चे वाटप केले आहे. गेल्या दोन वर्षा पासुन हा स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत.या उपक्रमामुळे गाव स्वच्छतेला हातभार लागत असुन त्यामुळे बँकेची सभासद संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.
महाटी गावातील या सामाजिक उपक्रमाच्या वेळी प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब पाटील, काशीनाथ पाटील, व्यंकटराव ढगे (पोलीस पाटील), व्यंकटराव पाटील (सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी), प्रभू पाटील ढगे, बळीराम पाटील ढगे (सरपंच), गंगाधर पाटील ढगे, प्रभाकर पाटील (तंटामुक्ती अध्यक्ष), संभाजीराव ढगे, हनुमंत ढगे (पैलवान), तिरुपती ढगे, माधवराव गाढे, बालाजी ढगे, सह शिवराजमुद्रा अर्बन बँकेचे संस्थेचे संचालक गजानन शिंदे, दिपक जाधव, रंजित गाढे, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.