प्रतिष्ठा न्यूज

रविवारी नांदेड येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी सन्मान सोहळा : भागवत देवसरकर

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : वाशिम सहकाराचे जनक सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याची उन्नती घडवून आनणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त व शेतकरी दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०. वाजता नियोजन भवन नांदेड येथे महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीमध्ये शेतकरी सन्मान सोहळा आयोजित केला असल्याची माहिती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी दिली आहे. मागील १० वर्षांपासून नांदेडमध्ये सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, यंदाही कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ११ व्यक्तीचा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे, राज्यभरातून अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून प्रस्तावातून सर्वोत्तम ११ व्यक्तीची निवड करून सन्मान गौरव करण्यात येणार आहेत, कार्यक्रमाला जिल्ह्यातील आमदार, खासदार यांना निमंत्रित केले असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पद्मश्री डॉ.विठलराव विखे पाटील कृषी परिषद अध्यक्ष श्री भागवत देवसरकर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.