प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तहसील मधील कोतवाल विजय डुबल यांना कार्यालयातून बाहेर काढा मनसेची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव तालुक्यातील हातनोली,धामणी,पाडळी या सज्जाचे कोतवाल विजय डुबल हे सज्जाचे काम न करता तासगांव तहसिल कार्यालयामध्ये पी.एम.किसान योजनेचे टेबल सांभाळत आहेत, संबंधित कोतवाला बाबत सामान्य नागरिकांकडून मोठया प्रमाणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाकडे  तक्रारी आल्या आहेत. हा कोतवाल बऱ्याच लोकांना भोगवाट क्रमांक दोन ची जमीन भोगवाट क्रमांक एक करून देतो म्हणून तहसीलदारांच्या नावाखाली पैसे उखळण्याचा व्यवसाय करीत आहे.तसेच पी.एम किसान योजनेबाबत सामान्य शेतकरी, नागरिक विचारपूस करणेसाठी गेले असता,त्यांना उडवाउडवीची उत्तरे देवून आपमानास्पद वागणूक देत आहे.तसेच तहसीलदार यांच्या दालनामध्ये दिवसातून १० ते १२ वेळा ये-जा करत असतो,कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बरोबर लोकांच्या कामामध्ये मध्यस्ती करीत असतो. एकूणच हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असून,या प्रकरणामध्ये आपण स्वतः लक्ष देवून कोतवाल विजय डुबल याला आपल्या कार्यालयातून ८ दिवसाच्या आत हाकलून दयावे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्याला हाकलण्यात येईल.यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जबाबदार राहणार नाही असे निवेदन आज सेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.