प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यासाठी दि. 2, 3 व 4 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट :- जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी – निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दि. 1 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 2, 3 व 4 सप्टेंबर 2023 हे 3 दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 2, 3 व 4 सप्टेंबर 2023 या 3 दिवसांच्या काळात जिल्ह्यात 1 किंवा 2 ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तेंव्हा खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी खालील प्रमाणे खबरदारी ( काळजी) घ्यावी.

● या गोष्टी करा●
1) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके बसा..
2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत
घराबाहेरील थांबू नका.
3) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
4) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर रहा.
5) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
●या गोष्टी करु नका●
1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
2) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
3) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका..
4) धातूंच्या उंच मनोन्याजवळ उभे टाकू नका.
5) जर आपण घरात तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून बीज पडताना नका. हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे.
तेंव्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याची खबरदारी (काळजी) घ्यावी असे आवाहन- मा.
महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.