प्रतिष्ठा न्यूज

एमटीईएस मराठी शाळेत चांद्रयान – ३ मोहिम यशस्वी झाल्याचा आनंदोत्सव साजरा

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित एमटीईएस मराठी शाळेत संपुर्ण देशाचे लक्ष्य लागलेल्या चांद्रयान – ३ च्या यशस्वी लँडींगचा आनंदोत्सव जोशात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारत देशाच्या नकाशाची प्रतिकृती तयार केली व विद्यार्थ्यांनी संचलन करत ’भारत माता की जय,  वंदे मातरम’ अशा घोषणा देऊन या यशस्वी मोहिमेला मानवंदना देण्यात आली. चांद्रयान – ३ बद्दल विस्तृत माहिती प्रशालेच्या  सह. शिक्षिका प्रेरणा कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी, समन्वयक रश्मी कुलकर्णी उपस्थित होत्या. तसेच सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज (बाबा) देशमुख, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर, तसेच सचिव सुरेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.