तासगाव येथे खा.संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न : 54 रक्तदात्यांनी केले रक्तदान
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव मध्ये आज खासदार संजय काका पाटील यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त युवा ग्रुप मित्रपरिवार,जियोलाइफ फॉउंडेशन आणि ॲग्रीमार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल मंदिर गुरुवार पेठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात उत्स्फूर्तपने 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास शाकाहारी किंवा मांसाहारी जेवण थाळी देण्यात आली.कार्यक्रमास खा.काकांचे सुपुत्र प्रभाकर बाबा पाटील यांनी भेट दिली,यावेळी मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी युवा ग्रुप मित्रपरिवाराचे सर्व सन्माननिय सदस्य उपस्थित होते.