प्रतिष्ठा न्यूज

कापशी बु. प्राथमिक आरोग्य केंद्रास सलग 5 वर्षांपासून “कायकल्प” पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट

उमरा प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील कापसी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय कायकल्प सन 2021-2022 मधील पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मागील 5 वर्षा पासुन सलग हा पुरस्कार मिळवणारे हे नांदेड जिल्ह्यातील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम केल्यामुळे हा पुरस्कार मिळवण्यासाठी आरोग्य केँद्रामध्ये चांगल्या सेवेची गुणवत्ता, अत्याधुनिक साहित्य सामुग्री, औषधी, परिसर स्वच्छता, तात्काळ रुग्ण सेवा, माता बालसंगोपण, प्रसुतीपुर्व तपासण्या व प्रसुती पश्चात दिल्या जाणाऱ्या सेवा, व गरोदर मातांची योग्य काळजी घेने, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट मुदतीपुर्वीच पुर्ण करणे, अशा प्राथमिक आरोग्य केंद्रास हा पुरस्कार दिला जातो. यापुर्वी या कापशी बु. आरोग्य केंद्रास चांगल्या आरोग्य सेवेसाठी “डाॅ.आनंदीबाई जोशी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच गुणात्मक सेवेसाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत .तसेच मागील पाच वर्षापासुन “कायाकल्प” उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवणारे हे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोराना  काळातही 87 टक्के लसीकरण केले होते. यंदाचा “कायाकल्प” पुरस्कार मिळाल्या बद्दल आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाँ.आर.के मुनेश्वर व कर्मचाऱ्यांचे रुग्ण कल्याण समितीच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन दि.30 डिसेंबर 2022 रोज शुक्रवारी यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य- शिवाजी आळणे, भिमाशंकर स्वामी, सुपरवायझर- एम.बि.श्रीमंगले, एस.एम.करकले, एमपिडब्यु- एम.पी.पारदे, एम.पी बुमरे, एस.एस.मठपती, एस.एस.श्रीरामवार, व्हि.ए.आढाव, आर.के.नागरगोजे, सि.डी.तेलंगे, कैलास वडवळे, तसेच पत्रकार- गणेशराव ढेपे, ऊत्तम हंबर्डे, संजय देशमुख, बालाजी शिंदे, आदीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.