प्रतिष्ठा न्यूज

आधार कार्ड नसलेले विद्यार्थी संच मान्यतेतून वगळण्यात येऊ नये: शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी : शिक्षक नेते ज.मो.अभ्यंकर यांची मागणी

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : शाळेतील विद्यार्थी संच मान्यता करीत असतांना फक्त आधार कार्ड असलेले विद्यार्थी ग्राहय धरण्यात येऊ नये.कारण शाळेतील अभिलेख नोंद आणि आधार कार्ड माहिती तफावत आढळत आहे.आणि आधार कार्ड दुरूस्ती साठी कालावधी लागतो आहे. तसेच संचमान्यता मंजूर करतांना आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या संचमान्यतेत ग्राह्य धरण्यात येणार आहे. परंतू बऱ्याच विद्यार्थ्यांना आधार कार्ड नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षक मोठ्या संख्येने अतिरिक्त होऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश वेळी आधार कार्ड सक्ती करू नये असे असताना संचमान्यता करतांना आधार कार्ड नुसार संच मान्यता दिल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. या बाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेब यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दिपक केसरकर यांना 18 मे 2023 रोजी पत्र दिले आहे. या पत्राची दखल शासनाने घेतल्यास अनेक शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत.याकडे शिक्षण तज्ञ तथा माजी शिक्षण संचालक ,श्री ज.मो. अभ्यंकर यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
आधार कार्ड दुरूस्ती बाबतीत पालकांना कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आली नाही.तसेच काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वेगवेगळ्या कारणामुळे तयार होऊ शकले नाहीत. त्यामध्ये दुर्गम भागातील विद्यार्थी भटक्या जाती जमातीतील पालकांचे पाल्य नेहमी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील पालकांची पाल्ये व कौटुंबिक अडचणीमुळे पालक आधार कार्ड दुरूस्ती करू शकले नाहीत. तसेच नैसर्गिक आपत्ती, सतत पडणारा अवकाळी पाऊस यामुळे उदरनिर्वाह समस्या निर्माण झाली आहे. त्यांना शासन स्तरावर पालकांना कोणतीही माहिती नाही. आणि आधार दुरूस्ती आॅनलाईन प्रक्रिया असल्याने बरेच दिवस लागत आहेत. शाळेतील अभिलेख नोंद आणि आधार कार्ड दुरूस्ती साठी बराच वेळ लागणार आहे.त्यामुळे शासनाने आधार व्हॅलीड न झालेले विद्यार्थी संच मान्यतेतून वगळण्यात येऊ नये. शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत याची नोंद शासनाने घ्यावी.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना आधार सक्तीचे करू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष श्री ज.मो.अभ्यंकर यांनी शिक्षणमंत्री ना.दरेकर यांच्या कडे लेखी निवेदनात केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.