प्रतिष्ठा न्यूज

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व लक्ष्यपुर्वक मेहनत घेऊन अभ्यास केल्यास परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करता येते : आ. श्यामसुंदर शिंदे

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व लक्ष्यपुर्वक अभ्यास केल्यास परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करता येते. व त्यातूनच आपल्या आई वडीलांच्या स्वप्नाची पुर्तता करता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगात वरील सर्व गुणांबरोबर आपल्या आई- वडील व गुरूजनां विषयी नितांत श्रद्धा असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन लोहा कंधार चे आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे यांनी केले आहे. विशेष अतिथी म्हणून मारतळा येथील ज्ञानेश्वरी प्रायमरी, सेकेंडरी ईंग्लिश स्कूल 10 वी च्या विद्यार्थ्यांना 10 विच्या परीक्षेपुर्वी आयोजित निरोप समारंभात ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी विचारमंचावर शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य संजय पाटील ढेपे हे होते.
पुढे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आ.श्यामसुंदर पाटील शिंदे म्हणाले की, मी आज तुमच्यासमोर आमदार म्हणून जरी उभा असलो तरी या पुर्वी मी भारतीय प्रशासन सेवेमध्ये जिल्हाधिकारी या पदासह अनेक मोठे पदे भुषवलेली आहेत. आणि या पदांपर्यंत जाताना विद्यार्थीदशेत माझ्यासारख्या सर्वासामान्य घरच्या विद्यार्थ्यांला अनेक अडचणींचा सामना करत करत यश प्राप्त करता आले. तुम्ही पण सर्वसामान्य घरचे शेतकरी कुटुंबातील मुले आहात. जरूर मोठे मोठे स्वप्न पहा, पण ते स्वप्न साकार करण्यासाठी खूप मेहनत घ्या. नम्रता अंगी ठेऊन अभ्यास करा, कमीत कमी वेळात समजून घेत जा, नक्कीच यश तुमच्या पायाजवळ लोटांगण घालेल. असेही ते म्हाणाले. यावेळी आशाताई शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पहा.ध्येयवेडे होऊन अभ्यास केल्यास तुम्ही खूप मोठे व्हाल असेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी नवव्या वर्गातील विद्यार्थी व सर्व शिक्षका तर्फे 10 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निरोप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्याक्रमाचे सुञसंचलन शेख सानिया हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इ. 9 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसह वर्गशिक्षक पुरूषोत्तम जोशी, श्रीराम ढेपे, विलास गोणारे, प्रकाश तारू, सुनिल तारू,आनंदा जाधव यांच्यासह प्रियदर्शिनी सामला, कान्होपाञा तिरमाले, चांगुणा भरकडे, रूपाली कुलकर्णी, स्वाती कपाळे या शिक्षकांनी परिश्रम घेऊन निरोप समारंभ यशस्वी केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.