प्रतिष्ठा न्यूज

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांची ‘ परशुराम’ ला भेट

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.१० : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण  यांनी परशुराम विद्यालय व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयला भेट दिली. त्यावेळी शाळेतील अपुऱ्या सुविधा बद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुस्ताक वडगावे, समितीचे अन्य सदस्यांनी त्यांना माहितीचे निवेदन दिले.
मुलांना बसण्यासाठी पाच खोल्या व समोर मोठा डोम, जुन्या तीन खोल्यांची दुरुस्ती व्हावी.आशा विविध मागण्यांसह  शिक्षक व शिपाई यांची जागा भरण्याचीही मागणी केली.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बजरंग तात्या पाटील, गटविकास अधिकारी माधुरी परीट, दिवेकर, गटशिक्षण अधिकारी आर व्ही कांबळे,  सरपंच मानसी कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शोभा नागावकर, सदस्य अरुण पोतदार, वृंदा पाध्ये, स्मिता बावडेकर आदि हजर होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.