प्रतिष्ठा न्यूज

शंभरगाव येथे हळदीचा ढोल करतांना गंभीर जखमी झालेले शेतकरी अर्जुन भोंग यांचा मृत्यू

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील शेतकरी अर्जुन दिगंबर भोंग वय- 45 हे शेतकरी आपल्या शेतात हाळदीचा ढोल करण्याचे काम सुरू असताना ढोल पहाण्यासाठी जवळ गेले असता एकदम ढोलचे झाकण डोक्याला लागल्यामुळे गंभीर जखमी झाले असता जवळच असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना विष्णूपुरी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी शेतकरी अर्जुन भोंग यांना मृत घोषीत केले.
मयत अर्जुन दिगंबर भोंग यांच्या पश्चात पत्नी, 4 मुली, 1 लहान 11 वर्षाचा मुलगा आहे. त्यांची थोरली मुलगी भाग्यश्रीचा विवाह 4 दिवसापुर्वीच दि.22 मे 2023 रोज सोमवारी झाला आहे. 4 मुली असल्यामुळे आर्थिक खर्चाला फाटा देत जवळच्या पाहुण्याच्या मुलाला शाल अंगठी कार्यक्रमात झाला होता. त्यामुळे सदरील कुटुंबावर फार मोठा आघात पोंहचल्यामुळे गावामध्ये खूप हळ हळ व्यक्त केली जात आहे.
अर्जुन दिगंबर भोंग हे शेतकरी आपली पत्नी व 4 मुली अनुक्रमे- भाग्यश्री, अश्विनी, संतोषी, शिवाणी, व 1 मुलगा समर्थ सह आपल्या छोट्याशा शेतीच्या अल्प उत्पनावर उपजीविका करत होते. 6 महिण्यापुर्वी आपली मोठी मुलगी भाग्यश्रीची सोयरीक गावाजवळच असलेल्या वाळकी बु.या गावी जवळच्या पाहुण्यात केली होती. व 4 दिवसापुर्वीच म्हणजे दि.22 मे 2023 रोज सोमवारी शाल अंगठी कार्यक्रमातच भाग्यश्रीचा विवाह संपन्न झाला होता. आता लग्नाचे कार्य झाले म्हणून अर्जुन भोंग हे शेतीच्या कामाला लागले. आपल्या शेतातील हाळदी चा ढोल करत असताना आज दि.25 मे 2023 रोज गुरुवारी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान ढोल लगत हाळदी पहाण्यासाठी गेला असता ढोलचे झाकण डोक्याला लागून गंभीररित्या जखमी झाले होते. लगेच त्यांना जवळील शेतकऱ्यांनी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्नालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी शेतकरी अर्जुन दिगंबर भोंग यांना मृत घोषीत केले. ही वार्ता गाव व परिसरात समजताच शेतकरी वर्ग व ग्रामस्थात मोठी हळहळ व दु:ख व्यक्त केल्या जात आहे. चार दिवसापुर्वीच मुलीच्या लग्नाच आनंदी सोहळा शाल अंगठीत पार पाडलेल्या कुटुंबावर हा फार मोठा आघात झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मयत अर्जुन दिगंबर भोंग यांच्या प्रेताचा पंचनामा शासकीय रूग्नालयात करून तेथेच त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात येत असल्याचे नातेवाईकांनी सांगीतले. त्यांचेवर आजच मुळगाव शंभरगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.