प्रतिष्ठा न्यूज

अजय सकटे, अनुष्का विभूते ठरले श्री. अरविंदराव मराठे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे विजेते

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : येथील कन्या महाविद्यालयात दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ सांगली -मिरज परिसरातील ज्येष्ठ उद्योजक व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री. अरविंदरावजी मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पदवी पदव्युत्तर गटातून अजय दिलीप सकटे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, संकेत कृष्णात पाटील, शिवराज कॉलेज, गडहिंग्लज, शिवम संजय माळकर, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, सांगली, प्रज्ञा श्रीकांत माळकर, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली. तर कनिष्ठ गटातून अनुष्का संतोषकुमार विभूते, हुतात्मा किसन अहिर विद्यालय व ज्युनि. कॉलेज, वाळवा यांनी प्रथम, श्रावणी वैभव संकपाळ, वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव यांनी द्वितीय, ऋतुजा सतीश पोवार, डी. के. टी. ई. इचलकरंजी यांनी तृतीय आणि सृष्टी श्रीशैल गौराजे, कन्या महाविद्यालय, मिरज यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. यंदा स्पर्धेचे तेरावे वर्षे होते .या स्पर्धेत कनिष्ठ विभागातून 37 तर पदवी व पदव्युत्तर गटातून 53 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उद्घाटन सौ.कविता मगदुम यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ .शैला गोखले होत्या. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वरिष्ठ विभागाचे वक्तृत्व स्पर्धा विभाग प्रमुख डॉ. गंगाधर चव्हाण यांनी करून दिला. आपल्या मनोगतात बोलताना कविता मगदूम यांनी वक्तृत्व हे स्पष्ट आणि अभिव्यक्त भाषणाचे कौशल्य असून या मिळालेल्या व्यासपीठाचा उपयोग करून यशप्राप्ती करण्याचा कानमंत्र दिला. अध्यक्षीय मनोगतात शैला गोखले यांनी वक्तृत्व ही कला असून ती जोपासावी. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद व उत्साह हेच या स्पर्धेचे यश असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी संस्थेचे सचिव राजू झाडबुके, उपप्राचार्या डॉ.सुनिता माळी, पर्यवेक्षिका प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य, कनिष्ठ विभागाचे स्पर्धा विभागप्रमुख प्रा. पांडुरंग तपासे आदी उपस्थित होते. आभार प्रा. कल्याणी कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. मिनाक्षी देवमाने यांनी केले.
दिवसभर चाललेल्या या स्पर्धेमध्ये पदवी व पदव्युत्तर विभागातील स्पर्धकांसाठी जीवन हे सुंदर आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता: राहील का मानवाची सत्ता ?, समाज माध्यमांच्या विळख्यात आजची तरुणाई, आत्मनिर्भर भारत, आरक्षण: वास्तव आणि गरज हे विषय देण्यात आले होते. तर कनिष्ठ विभागासाठी ‌‌ सृजनशीलता लोप पावत आहे का?, राजकारणातील युवकांचा सहभाग, पाणी पेटते आहे!, बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान, रील्स स्वैराचाराला आमंत्रण देत आहे का? असे विषय देण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण मुबारक उमराणी, आश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा भोसले, सुलभा तांबडे, रविराज तांबे या तज्ञ परीक्षकांनी केले.
संस्थेचे सचिव राजू झाडबुके यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. स्पर्धकांनी यावेळी मोफत प्रवेश, पोटभर जेवण व सांकेतिक क्रमांकावरून वस्तुनिष्ठ स्पर्धा घेण्याची पद्धत याबाबत मनोगतातून समाधान व्यक्त केले. स्पर्धकांनी शब्दफेक, देहबोली, आत्मविश्वास, सृजनशीलता, नवनिर्मिती हे पैलू आत्मसात करून वक्तृत्व कौशल्य समृद्ध करण्याचा सल्ला परीक्षक अश्विनी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून दिला.
‌ या स्पर्धेचे संयोजन उपप्राचार्या डॉ. सुनिता माळी, पर्यवेक्षिका प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य, डॉ. गंगाधर चव्हाण, प्रा.पांडूरंग तपासे, प्रा.रमेश कट्टीमणी, प्रा.विनायक वनमोरे, प्रा. विद्या पाटील, प्रा. किरण कदम, प्रा.भानुदास पवार, प्रा.मिनाक्षी देवमाने, प्रा.कल्याणी कुलकर्णी, प्रा.प्रमिला पाटील, प्रा. तुषार पाटील, डॉ. शबाना हळंगळी, डॉ. विनायक पवार, श्री. भारत माळी यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.