प्रतिष्ठा न्यूज

योगेवाडी एमआयडीसी आराखडा मंजुरी शिवसैनिकांमुळेच मंत्री उदय सामंत… संजय दाजींच्या मागणीवरून मुख्यमंत्री शिंदेच्या आदेशाने..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : योगेवाडी येथे एमआयडीसी उभी राहावी,बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे,तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना शिंदे गटाचे तासगाव तालुका अध्यक्ष संजय दाजी चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन योगेवाडी एमआयडीसी होणेबाबत आग्रही भूमिका घेतली होती.त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन करून  योगेवाडी एमआयडीसी प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार मंत्री सामंत यांनी आठच दिवसात एम आय डी सी चा आराखडा मंजूर करून तालुक्याचा अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लावला होता.*त्यावेळी राष्ट्रवादी कडूनहि एम आय डी सी आराखडा आम्हीच मंजूर करून आणल्याचे सांगून डिजिटल बाजी करून तासगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती*.त्यासंदर्भात  मंत्री सामंत यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी शिंदे गटाचे तासगाव तालुका शिवसेना अध्यक्ष संजय दाजी चव्हाण यांना पत्र देऊन शिवसैनिकांच्या लढ्याला यश आल्याचा खुलासा केला आहे.यावेळी बोलताना सामंत यांनी सांगितले माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या काळात तासगाव तालुक्यात योगेवाडी येथे एमआयडीसीला मंजुरी मिळाली होती, परंतु सदर एमआयडीसीचे काम फक्त कागदपत्रावरच मंजूर दिसत असून ती अजूनहि पूर्णत्वास गेली नाही.त्याबाबत अनेक वेळा फक्त चर्चाच झाली असून तालुक्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता ती तातडीने होणे गरजेचे असून तालुक्यातील युवक फक्त शेतीवर आणि मोलमजुरीवरच अवलंबून असून त्यांच्या हाताला काम नसल्याने तो गुन्हेगारी कडे वळत असल्याचे दिसून येत आहे.आर्थिक बाबतीत ही तालुका मागासलेलाच आहे,त्यामुळे एमआयडीसी होणे गरजेचे असल्याने याबाबत शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजयदाजी चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती तमाम शिवसैनिकांच्या वतीने केली होती,यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन करून तातडीने तालुक्यातील प्रलंबित योगेवाडी येथील एम आय डी सी बाबत चर्चा करून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसारच योगेवाडी येथील औद्योगिक क्षेत्राचा एमआयडीसीचा आराखडा मुख्यालयाने मंजूर केला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.