प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू महाराज दूरदृष्टी असलेले रयतेचें राजे..प्रा.डॉ.ए.टी.पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : राजर्षी शाहू महाराजांनी
प्राथमिक शिक्षणाचा सक्तीचा व मोफत शिक्षण देणारा कायदा केला, मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.सर्व जातीतील मुलांना शिक्षण घेण्यासाठी वसतीगृहांची निर्मिती केली.ज्ञान व विज्ञानाची जाण असणारे ते द्रष्टे राजे होते.रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न केले.त्यामुळे राजर्षी शाहू महाराज हे एक नाव न राहता ते एक तत्त्व झाले.ते दूरदृष्टी असलेले रयतेचे राजे होते,असे मार्गदर्शन प्रा.ए.टी.पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यीनीं समोर केले.
 तासगाव येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आरती पाटील व रुकसार जमादार या विद्यार्थिनींनी शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित भीत्तीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन झाले. स्मिता पाटील या विद्यार्थिनीने प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा सांगितली.त्यानंतर तृप्ती कांबळे व दामिनी आठवले या विद्यार्थिनींनी समयोचित मनोगते सादर केली.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ.ए.टी.पाटील यांनी ‘शाहू शिक्षण विचार’ या विषयावर आधारित विचारांचे सादरीकरण केले.त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून शाहू महाराजांचे सामाजिक कार्याचे सादरीकरण केले.प्रणाली म्हस्के व निकिता शहा यांनी सूत्रसंचालन तर सुस्मिता पाटील या विद्यार्थिनीने आभार अभिव्यक्ती केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.डॉ.ए.टी.पाटील,प्रा.डॉ.लक्ष्मी भंडारे,प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा.ए.आर.पंडित यांनी प्रयत्न केले.तर श्री एस.आर.कुंभार,सुजाता हजारे,अस्मिता साळी,श्री एच.टी.वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.