प्रतिष्ठा न्यूज

वेणेगाव येथे गो फ्रामंली कंपनीचे शानदार उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज
टेंभुर्णी प्रतिनिधी : समर्थ क्राॅप केअर संचलित गो फ्रामंली शाखा क्रमांक एक शाखेचे उद्घाटन आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरवात श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यादरम्यान समर्थ क्राॅप केअर कंपनीचे अध्यक्ष प्रशांत गवळी यांच्या हस्ते आमदार बबनराव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भरणे, जिल्हा परिषद सदस्य बंडू नाना गवळी, अमोल ढवळे आदींसह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान प्रशांत गवळी बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी समर्थ क्राॅप केअर कंपनी काम करत आहे. आधुनिक शेती करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी ग्रो फॅमिली सेंटर ची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र ५० कलेक्शन सेंटर भविष्यात देण्याचा कंपनीचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या भावाने विकला पाहिजे. शेतकऱ्यांकडून तेजी मंदी सुद्धा आमची कंपनी सोबत असणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे. बचत गट महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. समर्थ क्राॅप केअर कंपनीकडून फसवणूक होणार नसल्याचे मत प्रशांत गवळी यांनी बोलताना व्यक्त केले.
आमदार बबनराव शिंदे बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांची फसवणूक न करता विश्वासार्हता जपणे आवश्यक आहे. या भागात जास्त पालेभाज्या सह फळे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांशी विश्‍वासाने वागल्यास तुम्हास भविष्यात चागंले दिवस येतील असे मत आमदार बबनराव शिंदे यांनी व्यक्त केले.
यादरम्यान बंडू नाना गवळी, टेंभुर्णी चे कृषी अधिकारी कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रो फ्रामंली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.