प्रतिष्ठा न्यूज

माझी मुलगी माझा अभिमान संकल्पनेतून उमदी पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज
उमदी प्रतिनिधी : उमदी पोलीस ठाणे, जिल्हा सांगली येथे मा. पोलीस अधीक्षक संदिप घुगे सर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत सुनिल साळुखे सर यांचे संकल्पनेतुन माझी मुलगी माझा अभिमान या विचारातुन उमदी पोलीस ठाणे येथे ८ मार्च जागतिक महिला दिन निमीत्ताने उमदी पोलीस ठाणे दैनंदिन कामकाज महिला पोलीस अंमलदार यांचेकडे सोपविण्यात आले होते.

उमदी पोलीस ठाणेकडील ठाणे अंमलदार, ठाणे अंमलदार मदतनीस, पोलीस ठाणे गोपनिय कामकाज, वायरलेस, लेखनिक, सीसीटिएनएस, वाहतुक नियंत्रण, पेट्रोलींग पथक व रेड पथक हे सर्व कामकाज महिला पोलीस अंमलदार यांना सोपविण्यात आले होते. पोलीस ठाणे येथे दैनंदिन होणारे सर्व कामे हि महिला पोलीस अंमलदार यांनी पाहिली. महिला पोलीस अंमलदार यांचे पथकाने पोलीस ठाणे हद्दीत रेड करुन अवैध धंदयावर प्रभावी कारवाई केली आहे. महिला पोलीस अंमलदार यानी पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करुन वाहतुक अधिनियम अंतर्गत कारवाई केल्या आहेत. पोलीस ठाणे हद्दीत महिला पोलीस अंमलदार यांनी पेट्रोलींग करुन महिला या पुरुषांपेक्षा कमी नाहित हे दाखवून देत महिला पोलीस अंमलदार यांनी पोलीस ठाणे उमदी कडील दैनंदिन कामकाज यशस्वी रित्या पार पाडले आहे. दैनंदिन कामकाजानंतर महिला पोलीस अंमलदार यांचा मा. पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्या माझी मुलगी माझा अभिमान संकल्पनेतुन सन्मान करण्यात येवून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.